रविंद्र धंगेकर आणि हेमंत रासने एकाच व्यासपीठावर; भित्तिचित्राच्या लोकार्पण सोहळ्यात हजेरी | Kasba
भाजपाचे ज्येष्ठ नेते खासदार गिरीश बापट यांच्या विकास निधीमधून कसबा गणपती मंदिर परिसरात साकारण्यात आलेल्या पाच भित्तिचित्राचे लोकार्पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कसबा भाग संघचालक अॅड. प्रशांत यादव यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी खासदार गिरीश बापट यांचे चिरंजीव गौरव बापट,आमदार रविंद्र धंगेकर, भाजपचे नेते हेमंत रासने यांच्यासह नागरिक उपस्थित होते